कॅलिफोर्नियात निनादला जय शिवाजी, जय भवानीचा गजर

 कॅलिफोर्नियात शिवजयंती साजरी

परदेशातही निनादला जय शिवाजी, जय भवानीचा गजर


अहमदनगर (प्रतिनिधी)- रयतेसाठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी संपुर्ण देश दुमदुमत असताना अमेरिकेतील कॅलिफोर्नियात देखील जय शिवाजी, जय भवानीचा गजर दुमदुमला. कॅलिफोर्नियात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांनी एकत्र येत हॅरिटेज रोझ गार्डन सन जोस येथे शिवजयंती साजरी केली. गार्डन येथील शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सीए अभिजीत विधाते, प्रा. माणिक विधाते, राहुल शिंदे, सुधाकर महाजन, सौ.काळे, सौ.खेडकर, सौ.खादाट आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post