शिक्षकांसाठी "टीईटी' परीक्षा अनिवार्य

बारावीपर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य 
आतापर्यंत पहिली ते आठवीच्या वर्गांसाठीच टीईटीधारक शिक्षकांची नेमणूक बंधनकारक होती. यापुढे पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्गांसाठी शिक्षक नेमताना तो टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक होत आहे. नव्या धोरणानुसार  ‘एनसीटीई’ने तसा आदेश राज्यांच्या शिक्षण सचिवांसह सीबीएसई अध्यक्षांना दिला आहे.


राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेच्या (एनसीटीई) सदस्य सचिव केसंग शेरपा यांनी बुधवारी (३ फेब्रुवारी) हा आदेश ई-मेलद्वारे बजावला. गेल्या वर्षी केंद्राने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर केले. त्यानुसार पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याला गुणवंत, उच्चशिक्षित व व्यावसायिक पात्रताधारक शिक्षकाकडूनच शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शिक्षक प्रशिक्षणाबाबतही यात अनेक बदल सुचविले आहेत. त्यामुळे एनसीटीईने पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गांच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post