पवारांच्या ‘त्या’ टिकेला माजी आ.वैभव पिचड यांनी दिले प्रत्युत्तर

पिचड साहेब पक्षासाठी पायाला भिंगरी लावून काम करीत होते, तेव्हा झारीतील शुक्राचार्य नव्हते का?

माजी आ.वैभव पिचड यांचा सवालनगर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अकोले दौर्‍यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा झारीतील शुक्राचार्य असा अप्रत्यक्ष नामोल्लेख केला होता. पवारांच्या या टिकेला आता माजी आ.वैभव पिचड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मागील चाळीस वर्षे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहिलो. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी प्रदेशाध्यक्ष असताना पायाला भिंगरी लावून पक्षाचे काम केले. त्या वेळी झारीतील शुक्राचार्य नव्हते का,’’ असा सवाल उपस्थित करूनयापुढे व्यक्तिगत चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊन बंदोबस्त केला जाईल, असा इशाराही वैभव पिचड यांनी दिला आहे. राजूर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माजी आमदार वैभव पिचड यांनी अर्ज मागे घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काहींनी पिचड यांच्यावर वैयक्तिक टिका करीत त्यांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न केला. राजूर येथे आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला. पिचड म्हणाले की, भाजपमध्ये गेल्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली. पक्षाने मला अनुसूचित जमातीचे राष्ट्रीय मंत्रिपद देऊन सन्मान केला. या पदाचा उपयोग करून तळागाळातील आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारण्याचे काम करणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post