'या'कारणामुळे सहायक पोलिस निरीक्षक निलंबित

 सहायक पोलिस निरीक्षक रजपूत निलंबितनगर - खूनाच्या गुन्ह्याचा तपास करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत नगर तालुक्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांना निलंबित केले आहे.

अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.वाळकी (ता. नगर) येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग यांना सराईत गुन्हेगार विश्‍वजित कासार व इतरांनी मारहाण केली होती. या मारहाणीत भालसिंग यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांच्याकडे होता. काही दिवसांपूर्वी त्यांची पारनेर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. भालसिंग खून प्रकरणी तपास करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका निरीक्षक रजपूत यांच्यावर ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post