घरासमोर झोपलेल्या लोकांचे मोबाईल चोरणारे आरोपी मुद्देमालासह जेरबंद

 रात्रीचे वेळी घरासमोर झोपलेल्या लोकांचे मोबाईल चोरणारे आरोपी मुद्देमालासह जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.नगर (विक्रम बनकर) : दिनांक १७/१२/२०२० रोजीचे रात्री फिर्यादी  मारुती गणपत चव्हाण,( वय- ३१ वर्षे, रा. चव्हाण मळा, जामदार वाडा, कर्जत, ता- कर्जत, जि- अहमदनगर) हे घरासमोर झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात गुन्हेगारांनी त्यांचा १४ हजार ९९९/-रु. कि. चा रिअल-मी कंपनीचा मोबाईल चोरुन नेला होता. सदर चोरी बाबत फिर्यादी यांनी कर्जत पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर  पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला. त्यानुसार अविनाश घालमे, (रा. शिंदा, ता - कर्जत) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोना/संतोष लोढे, दिपक शिंदे, शंकर चौधरी, पोको प्रकाश वाघ, रविन्द्र घुंगासे, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून कर्जत येथे जावून  ताव्यात घेतले.  त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार  रोहीत उर्फ सोन्या काळे याच्यासह केल्याचे समोर आले. त्यांनी गुन्ह्यातील चोरलेला १४,९९९/-रु. किं. चा रिअल-मी कं. चा मोबाईल काढून दिल्याने तो जप्त करुन आरोपीना मुद्देमालासह कर्जत पो. स्टे. ला हजर करण्यात आले आहे. 

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post