बुर्‍हाणनगर येथे भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

 बुर्‍हाणनगर येथे भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

नामस्मरणाने भगवंताशी एकरुप होता येते : गणेश महाराज शेंडे



नगर(सचिन कलमदाणे) : येथील विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाच्यावतीने भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बुर्‍हाणनगर येथील राधाकृष्ण मंदिरात झालेल्या या सोहळ्यानिमित्त पिंपळनेर येथील ह.भ.प.गणेश महाराज शेंडे यांचे किर्तन झाले. या कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्यावतीने बुर्‍हाणनगरचे नवनिर्वाचित सरंपच रावसाहेब कर्डिले यांच्यासह सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

किर्तनात मार्गदर्शन करताना शेंडे महाराज म्हणाले की, जीवनात सुखी असताना भगवंतांचे नामस्मरण केले पाहिजे. म्हणजे दु:खाच्या प्रसंगात तग धरता येतो. नामस्मरणात असलेली ताकद ओळखली की सर्व चिंतांचा विसर पडतो. भगवंताशी एकरुप होता येते. विश्वकर्मा समाज हा नवनिर्मिती करणारा समाज असून समाजाने विश्वकर्मा जयंतीनिमित्त हरिकिर्तनाचा कार्यक्रम घेवून चांगला उपक्रम राबविल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी राधिका कलमदाणे, श्रध्दा कलमदाणे या विद्यार्थीनींनी भगवान विश्वकर्मा यांच्या महान कार्याची माहिती दिली. कार्यक्रमासाठी विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज सामुदायिक मंडळाचे शामराव कलमदाणे, संतोष नगरकर, दत्तात्रय नगरकर, गोकुळ कलमदाणे, कैलास कलमदाणे, सुभाष दुधाले, साईनाथ दुधाले, किशोर दुधाले, रमेश कलमदाणे,अमृत दुधाले, बालाजी कलमदाणे, संतोष कलमदाणे, ईश्वर दुधाले, संतोष दुधाले, रवींद्र दुधाले, विजय कलमदाणे, गणेश दुधाले, ज्योतीबा क्षीरसागर, यादव वाकचौरे, रामेश्वर तांबट, भाऊसाहेब वाकचौरे, लक्ष्मण तांबट, बाणेश्वर कलमदाणे, योगेश दुधाले, राहुल दुधाले, अभय कलमदाणे, बापूसाहेब औटी, सागर उंडे आदींनी योगदान दिले.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रेरणेतून झालेल्या या कार्यक्रमासाठी दत्ताभाऊ तापकिरे, सागर निमसे, अण्णा कचरे, रामभाऊ खर्से, रमेश बार्शीकर राजू साळे आदींसह ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post