हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर छापा, तीन महिलांची सुटका
नगर : राहुरीतील एका हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकून दोन जणांसह हॉटेल चालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तीन महिलांची सुटका केली. राहुरी बसस्थानक परिसरात काही महिला राजरोसपणे वेश्या व्यवसायासाठी बसत होत्या. त्या ठिकाणी गिर्हाईकाचा शोध घेऊन एका हॉटेलवर गिर्हाईकाला घेऊन जात होत्या. याबाबत पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, हवालदार लक्ष्मण बोडखे, पोलिस नाईक संजय जाधव, पी. सी. थोरात व महिला पोलिस कर्मचारी राधिका कोहकडे यांनी राहुरी बसस्थानकासमोर असलेल्या हॉटेल ऐश्वर्या येथे छापा टाकला. यावेळी दोन पुरूषांना आणि हॉटेल चालकाला ताब्यात घेतले.
Post a Comment