राज्यात कॉंग्रेसला उपमुख्यमंत्रीपद? अजितदादांनी दिली प्रतिक्रिया

 


राज्यात कॉंग्रेसला उपमुख्यमंत्रीपद? अजितदादांनी दिली प्रतिक्रियामुंबई:  कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद बदलाच्या हालचाली सुरु झाल्या असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसला उपमुख्यमंत्रिपद सुद्धा मिळणार अशी चर्चा आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असं म्हणत त्यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मुंबईत पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ’अशा बातम्यात काही तथ्य नाही आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करत असताना समसमान कार्यक्रम आखण्यात आला होता. त्यानुसारच आघाडी सरकारचे काम सुरू आहे. ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याप्रमाणे पुढे कामकाज होणार आहे’ असं अजितदादांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post