महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसला उपमुख्यमंत्रीपद? बाळासाहेब थोरातांच्या नावाची चर्चा

 महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसला उपमुख्यमंत्रीपद? बाळासाहेब थोरातांच्या नावाची चर्चामुंबई: कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षबदलाबरोबरच राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून राष्ट्रवादीप्रमाणे कॉंग्रेसनेही आता उपमुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरल्याची चर्चा आहे. याबदल्यात कॉंग्रेस विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला देण्यास तयार झाली असून शिवसेनेकडूनही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका अद्याप समोर आली नसली तरी कॉंग्रेसकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात ही पदांबाबत चर्चा होत असली, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सध्याच्या सरकारमधील तिन्ही पक्षांमधील दुवा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. कॉंग्रेस आणि शिवसेनेचे जे प्रस्ताव आहेत, ते राष्ट्रवादीला मान्य होतीलच असे नाही. राष्ट्रवादीही एखाद्या पदावर दावा सांगू शकते, असं राजकीय जाणकार सांगतात.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post