आज 'इतक्या'नवीन बाधितांची भर

 दिनांक २ फेब्रुवारी, २०२१, सायं.६ वा

आतापर्यंत ७० हजार ३५७ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१५ टक्के

आज १०६ रूग्णांना डिस्चार्ज तर ४५ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर




अहमदनगर: जिल्ह्यात आज १०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ३५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९६३ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८ आणि अँटीजेन चाचणीत १४ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पाथर्डी ०२ आणि संगमनेर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०९, राहाता ०२, राहुरी ०१ आणि शेवगाव ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १४ जण बाधित आढळुन आले. मनपा ०४, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०१ आणि राहुरी  ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा २९, जामखेड ०१, कोपर गाव ०७, नगर ग्रामीण २४, नेवासा ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०९, राहाता ०७,  संगमनेर ११, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०३ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:७०३५७


उपचार सुरू असलेले रूग्ण: ९६३


मृत्यू:११०२


एकूण रूग्ण संख्या:७२४२२


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका


माझेकुटुंब_माझीजबाबदारी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post