शुभमंगल 'सावधान'....कार्यालय मालकांसह विना मास्क असलेल्यांवर दंडात्मक कारवाई

 शुभमंगल सावधान....कार्यालय मालकांसह विना मास्क असलेल्यांवर दंडात्मक कारवाई



नगर : विवाह समारंभात शासन नियमापेक्षा जास्त गर्दी जमल्यास आता मंगल कार्यालया मालकांसह आयोजकावर दंडात्मक कारवाई केली जाईल. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर शहरातील आशीर्वाद लॉन्स , सिटी लॉन्स, ताज लॉन्स व नगर कॉलेज  येथे अचानक भेट देऊन पहाणी केली असता मास्क न लावणे, लग्न समारंभात जास्त गर्दी आढळली असता दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाने जिल्ह्यातील २४३ मंगल कार्यालयांना नोटीसा बजावल्या आहेत.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post