प्रा.राम शिंदेंच्या होम ग्राउंडवर आ.रोहित पवारांची बाजी

 प्रा.राम शिंदेंच्या होम ग्राउंडवर आ.रोहित पवारांची बाजीनगर : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजीमंत्री राम शिंदे यांच्या गावातील चौंडी ग्रामपंचायतीवर आमदार रोहित पवार गटाने वर्चस्व मिळविले आहे. पवार गटाच्या आशाबाई सुनील उबाळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदी पवार गटाचेच कल्याण रामभाऊ शिंदे यांची निवड झाली आहे. या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. या  निवडणुकीत प्रथमच माजी मंत्री राम शिंदे गटाचा पराभव झाला. 9 पैकी 7 जागा आमदार पवार गटाला मिळाल्या होत्या. तर शिंदे गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, मंगळवारी झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडीत पवार गटानेच बाजी मारली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post