जिल्हा रूग्णालयात लागल्या लांबच लांब रांगा....

 


जिल्हा रूग्णालयात लागल्या लांबच लांब रांगा....


                                                                                            छाया : विक्रम बनकर

नगर : राज्यात तसेच नगर जिल्ह्यात करोना रूग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याचे चित्र असताना बुधवारी सकाळी नगरच्या जिल्हा रूग्णालयाच्या आवारात लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळाले. रस्त्यावरुन येणारे जाणारे या रांगा पाहून चांगलेच धास्तावले. करोनाची मोठी लाट येते की काय अशी शंका मनात निर्माण झाली. मात्र जिल्हा रूग्णालयातील या रांगा करोनाशी संबंधित नसून अपंगाच्या तपासणीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रूग्णालयाचे कामकाज पूर्ववत सुरु करण्यात येत असून पूर्वीप्रमाणे दर बुधवारी अपंग तपासणी, प्रमाणपत्र वितरण तसेच नुतनीकरणाचे काम सुरु झाले आहे. या प्रमाणपत्रासाठी अपंगांनी सकाळीच रूग्णालयात रांगा लावल्या. कोविड मुळे सर्वांना एकाचवेळी आत प्रवेश न देता रांगा लावून नंबर लावण्यात येत आहेत. त्यामुळे रूग्णालयाच्या आवारात ही मोठी गर्दी दिसून आल्याचे समोर आलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post