महाविकास आघाडी सरकारची पहिली विकेट पडली...संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
मुंबई : परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणात संशयाच्या भोवर्यात सापडलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला असून मुख्यमंत्र्यांनीही तो स्विकारल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित संबंधामुळे पूजा चव्हाणने आत्महत्या केली असा आरोप भाजपाने केला होता. आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं होतं. राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने केली होती. वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांचा राजीनाम्याबाबत सोमवारपासून विविध चर्चा सुरु होत्या.
Post a Comment