देशात स्वातंत्र्यानंतर प्रथमच महिलेला मिळणार फाशी..
मथुरा तुरूंगात महिलेला फाशी देण्याची तयारी तुरूंग प्रशासनाने सुरू केली आहे. ही फाशी अमरोहाची राहणारी महिला शबनमला दिली जात आहे. या महिलेने एप्रिल २००८ मध्ये प्रियकर सलीमसोबत मिळून आपल्या घरातील ७ लोकांची कुऱ्हाडीने कापून हत्या केली होती. मथुरा तुरूंग प्रशासनाने फाशीच्या दोराची ऑर्डर दिली आहे. दोषी शबनमने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवला. यानंतर शबनम-सलीमने राष्ट्रपतींकडे केलेला माफीचा अर्जही फेटाळण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर शबनम पहिली महिला कैदी असेल जिला फाशी दिली जाईल. देशात केवळ मथुरेच्या तुरूंगातील फाशी घरातच महिलेला फाशी दिली जाऊ शकते. सद्या शबनम बरेलीच्या तर सलीम आग्र्यातील तुरूंगात बंद आहे. अमरोहाच्या हसनपूरमधील बावनखेडी गावात २००८ च्या १४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली होती. इथे शबनमने आपला प्रियकर सलीमसोबत मिळून आपले वडील, शिक्षक शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिणी अंजुम आणि चुलत बहीण राबिया यांची कुऱ्हाडीने कापून हत्या केली होती. भाचा अर्शचा गळा आवळला होता. हे लोक तिच्या प्रेमात आडकाठी ठरत होते.
Post a Comment