बीग बी अमिताभची तब्येत बिघडली...चाहते काळजीत

 बीग बी अमिताभची तब्येत बिघडली...चाहते काळजीतमुंबई: बॉलिवूडचा महानायक अमिताभने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून अशी एक माहिती दिलीय की त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या काळजीत भर पडलीय.

अमिताभने आपल्या ब्लॉगमध्ये केवळ एकच ओळ लिहलीय, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. त्याने लिहलंय की, "मेडिकल कन्डिशन.... सर्जरी... मी लिहू शकत नाही. एबी." अमिताभने हा ब्लॉग 27 तारखेला लिहलाय. बीग बीचा हा ब्लॉग वाचल्यानंतर चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

अमिताभला नेमका कसला त्रास आहे आणि त्याला कोणत्या सर्जरीला सामोरं जावं लागतंय याची कोणतीही माहिती नाही. सध्या त्याच्या अनेक चित्रपटांचे शुटिंग सुरु आहे. कोण बनेगा करोडपती 12 हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर अमिताभ ब्रह्मस्त्र आणि चेहरे या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. याचदरम्यान ही बातमी आल्याने सर्वजण काळजीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post