राष्ट्रभाषा रत्न राज्यस्तर पुरस्कार संजय भुसारी यांना प्रदान

 राष्ट्रभाषा रत्न राज्यस्तर पुरस्कार संजय भुसारी यांना प्रदान
कुकाना:- गोवा हिंदी अकादमी गोवा पुरस्कृत महाराष्ट्र राज्यस्तरीय हिंदी प्रचारक संमेलन संमेलन प्रसंगी राष्ट्रभाषा रत्न राज्यस्तर पुरस्कार श्री मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या सुदामराव मते पाटील विद्यालय गोगलगावचे हिंदी विषय शिक्षक व जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय भुसारी यांना गोव्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांचे शुभ हस्ते मिरामार पणजी येथे आयोजित राज्यस्तर संमेलनात प्रदान करण्यात आला यावेळी अहमदनगर जिल्ह्यातून सोळा अध्यापक ,अध्यापिकाना सन्मानित करण्यात आले,. संजय भुसारी हे गेल्या वीस वर्षांपासून हिंदी विषयाचे अध्यापन करत असून,हिंदी विषय तज्ञ म्हणून राज्यस्तर, जिल्हास्तर , तालुका स्तरावर काम केलेले आहे .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोवा हिंदी अकादमीचे अध्यक्ष सुनील शेठ स्वागताध्यक्ष कैलास जाधव उपस्थीत होते . संजय भुसारी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा आ नरेंद्रजी घुले पाटील, जिल्हा बँकेचे संचालक, नामदार राजश्रीताई घुले पाटील, व्हा चेअरमन पांडुरंग अभंग,सभापती क्षितिज भैय्या घुले पाटील संचालक काकासाहेब नरवडे, काशीनाथ आण्णा नवले, सेक्रेटरी अनिल शेवाळे,संचालक बबनराव भुसारी,काकासाहेब शिंदे,प्रशासकीय अधिकारी दिनकरराव टेकणे सर,जनसंपर्क अधिकारी कल्याणराव म्हस्के समनव्यक डॉ रामकीसन सासवडे, मुख्याध्यापक कैलास भारस्कर यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post