बेलवंडी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयास मिळाले गुणवत्तेचे ISO मानांकन.

 बेलवंडी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयास मिळाले गुणवत्तेचे ISO मानांकन.

श्रीगोंदा /प्रतिनिधी  :- बेलवंडी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयास नुकतेच ISO मानांकन प्राप्त झाले. या मानांकनामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.संस्थेची स्थापना 16 जून 1960 रोजी झाली असुन,

शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी,इयत्ता 10 वी इयत्ता 12 वी निकालाची उत्कृष्ट परंपरा,भौतिक बाबींची सुधारणा,प्रशस्त G+3 इमारत व नवीन सुरू असलेली G+2 इमारत,उत्कृष्ट क्रीडांगण,RO पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,स्वछता गृह,वृक्षसंवर्धन इत्यादी बाबी चांगल्या दर्जाच्या असल्याने रयत शिक्षण संस्थेच्या बेलवंडी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयास सर्वांगीण बाबींच्या उत्कृष्ठतेबद्दल गुणवत्तेचे ISO 9001-2015 मानांकन 26जानेवारी 2021 रोजी प्राप्त झाले आहे.ही बाब ग्रामस्थ,पालक,सेवक,विद्यार्थी व संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची आहे.विद्यालयाचे असंख्य माजी विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षण घेत आहेत तर काही चांगल्या पदावर कार्यरत आहेत.

या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासाच्या प्रगतीमध्ये शिक्षणप्रेमी ग्रामस्थ,देणगीदार यांचे मोलाचे योगदान आहे.सर्वांच्या विशेष प्रयत्नातून विद्यालयास मिळालेला सन्मान कौतुकास्पद आहे.विद्यालयाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व प्राचार्य संपतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदेव कडाळे यांनी ISO मानांकनाची रूपरेषा आखली व परिपूर्तीसाठी विद्यालयातील सर्व सेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

या यशाबद्दल विद्यालयाच्या स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य आण्णासाहेब शेलार(जनरल बॉडी सदस्य,र.शि.संस्था),तसेच तुकाराम कन्हेरकर(विभागीय अधिकारी र.शि.संस्था,उत्तर विभाग अहमदनगर),बाबासाहेब भोस(मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,र.शि.संस्था),आशुतोष काळे(विभागीय अध्यक्ष,र.शि.संस्था,उत्तर विभाग अहमदनगर)संजय नागपुरे संस्था पदाधिकारी व विविध शालेय समित्यांचे पदाधिकारी,ग्रामपंचायत,सोसायटी,पतसंस्था,बँक पदाधिकारी व बेलवंडी पंचक्रोशीतील सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post