शिक्षक बँकेच्या कर्जाचा व्याजदर कमी करण्याचा निर्णय

 शिक्षक बँकेच्या कर्जाचा व्याजदर कमी करण्याचा निर्णय.. चेअरमन राजू राहणे..


अहमदनगर - येत्या सोळा मार्च पासून शिक्षक बँकेने आपल्या विविध कर्जांचे व्याजदर कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेतला. शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या तालुका अध्यक्ष यांची आज सहविचार सभा आयोजित केली होती .या सभेत सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी शिक्षक बँकेने व्याजदर कमी करण्याची आग्रही मागणी केली होती. तसेच सर्वसामान्य सभासद व्याजदर कमी करण्याची सातत्याने मागणी करत होता.त्याला प्रतिसाद देत येत्या 16 मार्च पासून शिक्षक बँकेने जामीन कर्जावरील व्याजदर ०.४०% कमी करून ९ .९० वरून कमी करून ९.५० % केला आहे.

तसेच शैक्षणिक कर्ज, गृहबांधणी ,गृह खरेदी, गृह तारण व वाहन खरेदी या सर्व कर्जावरील व्याजदर ९% केला असून जवळपास 0. 90 % व्याज दर कमी केला आहे .आज शिक्षक बँकेत  श्री आर. टी. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री बापूसाहेब तांबे , माजी चेअरमन गोकुळ कळमकर,किसन वराट,बाळासाहेब सरोदे ,संदीप मोटे, नारायण पिसे ,मच्छिंद्र लोखंडे,विठ्ठलराव फुंदे ,बाळासाहेब तापकीर ,  महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती विद्युल्लता आढाव, महिला आघाडी उत्तर जिल्हा प्रमुख अंजली मुळे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, दे.शी. जाधव ,मोहनराव पागिरे,बाळासाहेब चाबुकस्वार, माजी चेअरमन संतोष दुसंगे, साहेबराव अनाप,शरद भाऊ सुद्रिक, माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब मुखेकर ,श्रीमती उषाताई बनकर , संचालक श्री सलीमखान पठाण, किसनराव खेमनर, गंगाराम गोडे, बाबा खरात ,अर्जुन शिरसाट, सुयोग पवार ,अनिल भवार ,उत्तर जिल्हाप्रमुख राजकुमार साळवे, भाऊराव राहिंज , पी डी सोनवणे , संतोष राऊत,आबा दळवी ,राम वाकचौरे, रामेश्वर चोपडे, प्रदीप राहाणे,कैलास निकम , ना.ची. शिंदे ,संतोष मगर,यांच्या सह सर्व तालुका अध्यक्ष आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

निर्णयाचे जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांनी स्वागत केले असून गेल्या अनेक वर्षापासून इतक्या कमी मार्जिन मध्ये बँक चालवण्याचा विक्रम या संचालक मंडळाने केला आहे. असे गौरवोद्गार अनेक कार्यकर्त्यांनी काढले. 

या व्याजदर कपातीच्या निर्णयामुळे पस्तीस लाख रुपये कर्ज असणाऱ्या सभासदांना वार्षिक १४ हजार , ३० लाख कर्ज असणाऱ्या सभासदांना वार्षिक बारा हजार रुपये तर वीस लाख कर्ज असणाऱ्या सभासदांना वार्षिक आठ हजार रुपये फायदा होणार आहे..सर्वसाधारणपणे सभासदांना दरमहा सरासरी ६५० रुपये ते ११६६ रुपये फायदा होणार आहे.

गुरुमाऊली मंडळ सत्तेवर आल्यापासून कर्जाचा व्याज दर सातत्याने कमीच केला आहे. सत्तेवर येऊन कर्ज दर न वाढवता व्याजदर कमी करणारे हे संचालक मंडळ एकमेव आहे. या मंडळाच्या नेतृत्वाखाली  कायम ठेवीवर सातत्याने वाढता व्याजदर मिळालेला असून लाभांश वाढताच दिला आहे. बँकेच्या संचालकांच्या मंडळाच्या विश्वासावरच बँकेने साडे अकराशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे ही जिल्ह्यातील सर्वसामान्य गुरुजींच्या दृष्टीने अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post