ओबीसी बारा बलुतेदार जिल्हाउपाध्यक्ष अनिल इवळे तर शहराध्यक्ष शाम औटी यांची निवड

 ओबीसी बारा बलुतेदार जिल्हाउपाध्यक्ष अनिल इवळे 

तर शहराध्यक्ष शाम औटी यांची निवड पदापेक्षा कामाला महत्व द्या- माऊली गायकवाड 

         नगर- समाजात काम करताना एक सेवा म्हणून व्रत स्विकारले पाहिजे आपण काही तरी देणे लागतो हि भावना ठेवून तळमळीने काम करा आपल्या पदापेक्षा कामाला महत्व द्या. तुम्हाला दिलेले पद हे काम करण्यासाठी आहे त्याला न्याय द्या असे प्रतिपादन जिल्हध्यक्ष माऊली गायकवाड यांनी केले आहे. 

ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजेश सटाणकर, नगर शहराध्यक्ष शाम औटी, शहरसंपर्क प्रमुख संजय उदमले तर पाथर्डी तालुकाध्यक्षपदी सिताराम शिंदे यांच्या नवीन नियुक्त्या करुन श्री गायकवाड यांचे हस्ते पत्रे देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

यावेळी जालिंदर बोरुडे, राजेंद्र पडोळे, बबनराव कुसाळकर, दिलीप मते, संदीप घुले, मल्हारी गीते, स्वप्निल नांदुरकर, संतोष शिंदे, आदिनाथ गायकवाड उपस्थित होते. 

श्री गायकवाड पुढे बोलताना म्हणाले कि, ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या माध्यमातून सर्व समाज एकत्र येत आहे. समाजासाठी काम करताना एकीचे बळ महत्वाचे असते ते या आपल्या उपस्थितीवरुन दिसते, तुमच्या पदापेक्षा तुम्ही केलेले काम मोठे असते, त्या पदाला न्याय द्या असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी राजेश सटाणकर यांनी समाजात वावरताना काम करताना त्याची सुरुवात आपल्या घरातून करा याचे उदाहरणे देत त्यांनी सर्वांना एकसंघ राहा असे आवाहन केले. नवनिर्वाचित उपाध्यक्ष इवळे, शहराध्यक्ष औटी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी जिल्हा योगप्रचारक दिलीप मते यांचा महासंघातर्फे सन्मान करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post