चांगल्या आरोग्याचे वाण ही आजच्या काळाची मोठी गरज : राणीताई लंके

 चांगल्या आरोग्याचे वाण ही आजच्या काळाची मोठी गरज : राणीताई लंके

चास प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी वाण आरोग्याचा कार्यक्रमनगर : घरातील महिला आनंदी, निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते. महिलांनी गृहकर्तव्य बजवाताना स्वत:च्या आरोग्याबाबतही तितकेच जागरुक राहिले पाहिजे. प्रकृतीच्या छोट्या तक्रारीकडेही वेळीच लक्ष देवून काळजी घेतली पाहिजे. आरोग्याचे वाण ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनी केले.
नगर तालुका महीला राष्ट्रवादी महीला आघाडीतर्फे जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या अध्यक्षतेखाली चास (ता.नगर) येथील प्राथमिक आरोग्य केद्रात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महीलांसाठी ‘वाण आरोग्याचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना लंके बोलत होत्या. याप्रसंगी महीला राष्ट्रवादी आघाडीच्या अध्यक्षा विद्या भोर, भांबरेताई, डॉ.निवेदिता माने,डॉ.छायाताई नन्नवरे, डॉ.चाबुकस्वार ,चास ग्रामपंचायत येथील नवनिर्वाचित सदस्या प्रतिभा डावखरे, वर्षा शिंदे, दिपाली देवकर, उमेद अभियान बचत गटाच्या सुनिता देवकर आदी उपस्थित होत्या. परिसरातील मळगंगा महीला समूह गट,वैष्णवी महीला समूह गट, नाथकृपा महीला समूह गटातील सर्व महीलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. विद्याताई भोर यांनी  सागितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसने वाण आरोग्याचाया कार्यक्रमाचे राज्यभर  आयोजन करुन  महीलांच्या  आरोग्याबाबत जनजागृतीचे कार्य हाती घेतले आहे. या उपक्रमातून महिलांना आरोग्यसंपन्न राहण्याचा मंत्र दिला जाणार आहे. भांबरे ताई यांनी महीलांना बचतगटांविषयी माहीती देवुन महीलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता देवकर यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आलेल्या सर्व महीलाची तपासणी करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post