कोण होणार सभापती? अविनाश घुलेंच्या नावाची चर्चा

 कोण होणार सभापती? अविनाश घुलेंच्या नावाची चर्चा



अहमदनगर : महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात स्थायी समिती सभापतीपदासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सभापती निवडणूकीचा प्रस्ताव नाशिक येथील विभागीय आयुक्तांना मंगळवारी पाठविण्यात आला. त्यामुळे सभापती निवडणूकीचा मार्ग मोकळाला झाला आहे. सभापती पदासाठी रष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांच्या नावाची चर्चा आहे. महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नव्याने आठ सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. भाजपाचे मनोज कोतकर हे सध्या सभापती आहेत. त्यांचे सभापती पद आठ सदस्यांची नव्याने नियुक्ती केल्याने धोक्यात आले आहे. नवीन आठ सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर सभापती पदाच्या निवडणूकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविला जातो. विभागीय आयुक्तांकडून सभापती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. महापालिकेच्या नगरसचिव विभागाने आयुक्त तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या मान्यतेने प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. विभागीय आयुक्तांकडून निवडणूकीची वेळ व तारीख जाहीर केली जाईल. दरम्यान, नूतन सभापती निवडीवेळी महाविकास आघाडी 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post