जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी चुरस, 6 मार्चला होणार निवड

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी चुरस, 6 मार्चला होणार निवडनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी ६ मार्च रोजी संचालक मंडळाची सभा बोलविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्या सूचनेनुसार संचालकांना शुक्रवारी सायंकाळी सभेची विषय पत्रिका पाठविण्यात आली आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्य निवडीसाठी बँकेच्या स्व. मारुतराव घुले पाटील सभागृहात ६ मार्च रोजी दुपारी १ वाजता सभा होणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाची  निवडणूक नुकतीच पार पडली. विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी नवनिर्वाचित संचालकांची नावे असलेली अधिसूचना जारी केली. नवनिर्वाचित संचालकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर केली आहे. येत्या शनिवारी ही सभा होईल. सभेचे पीठासन अधिकारी म्हणून आहेर हे काम पाहतील.  महाविकास आघाडीने सर्वांच्या सहमतीने अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post