कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून तरूणाची आत्महत्या

 लॉकडाऊन झाल्यास कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून तरूणाची आत्महत्यानगर : राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात विष्णू गांगुर्डे या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विष्णू बाबासाहेब गांगुर्डे (वय ३० वर्षे राहणार गौतम नगर, रेल्वे स्टेशन, राहुरी) हा तरुण मोलमजूरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होता.  त्याने बचत गटातून कर्ज काढले होते. काही प्रमाणात मित्रांकडून हातउसने रूपये घेतले होते. सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाले तर कर्जाचे हप्ते कसे फेडायचे व ऊसने घेतलेले रूपये परत कसे करायचे याची चिंता विष्णूला काही दिवसांपासून सतावत होती. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी अशी शंका विष्णूच्या मित्रांकडून मिळाली.

 या घटने बाबत राहुरी पोलीसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post