जोडी नं.१... पत्नी सरपंच तर पती उपसरपंच

 जोडी नं.१, पत्नी सरपंच तर पती उपसरपंचनगर : ग्रामपंचायतीत एकाच घरातील मंडळी सदस्य असतात पण नगर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत पती-पत्नी एकाच वेळी सरपंच, उपसरपंच म्हणून निवडून आले आहेत. पारनेर तालुक्यातील वाळवणे ग्रामपंचायत निवडणुकीत हा योगायोग घडला आहे. जयश्री पठारे व सचिन पठारे असं या दाम्पत्याचे नाव आहे. दोघं आधी बिनविरोध सदस्य झाले. नंतर सरपंच निवडीवेळी जयश्री पठारे या सरपंच तर सचिन पठारे हे उपसरपंच झालेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post