वाडिया पार्क जलतरण तलाव खुला करावा

 नगर शहरमधील वाडिया पार्क येथील जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात यावा - भगवान फुलसौंदर 



नगर - राज्यात कोरोना चे संकट आता कमी होताना दिसत आहे .त्याच बरोबर सरकार आता सर्व सुरु करण्याची परवानगी देत आहे परंतु अजूनही वाडिया पार्क येथील जलतरण  तलाव  बंद आहे तरी तो सुरु करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान  फुलसौंदर यानी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळासह व नागरिकांसह दिले आहे यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड ,शहरप्रमुख दिलीप सातपुते ,उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव ,नगरसेवक शाम नळकांडे ,अमोल येवले ,मनीष गुगळे ,बंजरग भुतारे ,विजयकुमार बोरुडे ,विकास गिरी ,अतुल मुनोत ,रसिक कटारिया ,शिवलिंग डोंगरे आदी उपिस्थत होते 

यावेळी बोलताना  फुलसौंदर  म्हणाले कि आता एस टी बस ,सिनेमा ग्रह आदी विविध पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत तर मग जलतरण तलाव का नाही सुरु होत सध्या कोविड पासून बंद असलेला या जलतरण तलावाचे अनेक वार्षिक सभासद आहेत त्यामध्ये अनेकजण विविध आजाराने ग्रस्त आहेत अशा वेळी तलाव बंद असलेने त्यांना अनेक आरोग्य समस्यना सामोरे जावे लागते तरी हा जलतरण तलाव लवकरात लवकर सुरु करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post