जिल्हा बँक निवडणुकीतील राजकारणाबाबत मतदानानंतर गौप्यस्फोट: खा.सुजय विखे

 जिल्हा बँक निवडणुकीतील राजकारणाबाबत मतदानानंतर गौप्यस्फोट: खा.सुजय विखेनगर- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहमती एक्स्प्रेस मुळे साईड ट्रॅक झालेले खा. डॉ. सुजय विखे हे  मतदानानंतर गौप्यस्फोट करणार आहेत.

आपली सविस्तर भूमिका त्यादिवशी पत्रकारांसमोर मांडू असे स्पष्ट करत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे भाजप समन्वय समितीचे प्रतिनिधी म्हणून मंत्री थोरातांना भेटायला गेले असतील असंही त्यांनी सांगितलं.

नगर येथे पत्रकारांशी बोलताना खा. विखे यांनी ही माहिती दिली.  जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे आणि शिवाजीराव कर्डिले यांची समन्वय समिती स्थापन केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीत पक्षविरहित निवडणुकीसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. कर्डिले हे समन्वय समितीचे प्रतिनिधी म्हणून मंत्री थोरातांकडे गेले असतील असे सांगत त्यासंदर्भात 21 तारखेला बोलेल असे त्यांनी सांगितले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post