मोठी दुर्घटना....उत्तराखंडात हिमकडा कोसळल्याने महापूर, १५० हुन अधिक जण बेपत्ता

 

मोठी दुर्घटना....उत्तराखंडात हिमकडा कोसळल्याने महापूर, १५० हुन अधिक जण बेपत्ताउत्तराखंड : उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला आहे. या महापूरात धरणाच्या भीतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेक लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 150 ते 200 जण बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिद्धिमा अग्रवाल यांनी सांगितलं की, अनेक लोक दोन वीज प्रकल्पांवर काम करत होते. जोशीमठमध्ये हिमकडा कोसळल्याने पाण्याच्या वेगवान प्रवाहाने वाटेत आलेल्या दोन प्रकल्पांवर काम करत असलेले अनेक लोक बेपत्ता आहेत.उत्तराखंडमधील या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. याशिवाय, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. अधिकारी युद्धपातळीवर काम करत असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post