कुंपणच शेत खाते.... उपसरपंचावर पाणी चोरी केल्याचा गुन्हा

 उपसरपंचावर पाणी चोरीचा गुन्हा दाखल  राहुरी (राजेंद्र उंडे): तालुक्यातील रामपूर येथील उपसरपंच राहुल रावसाहेब साबळे यांच्यावर ग्रामंचायतच्या मुख्य जल वाहिनीतून चोरुन नळ घेऊन पाणी वापरीत होते असा गुन्हा रामपूरच्या ग्रामसेवक प्रतिभा भरसाकळ यांनी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली
 
ग्रामसेवक प्रतिभा भरसाकळ यांनी राहुरी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि , आरोपी विद्यमान उपसरपंच राहूल रावसाहेब साबळे याने रामपुर ग्रामपंचायत मार्फत रामपुर गावाला शासकीय पाणीपुरवठा होत असलेल्या मुख्या जलवाहीनीला वंन्डर पाईप जोडून स्वताचे फायदयाकरीता शासकीय पाण्याची चोरी करतांना मिळुन आला आहे .
आरोपी उपसरपंच राहूल रावसाहेब साबळे हे डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व ताहराबाद महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष  रावसाहेब साबळे यांचे चिरंजीव आहेत. त्या मुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाइक  संजय राठोड हे करीत आहे 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post