नगर जिल्ह्यातील 'या' गावात एकाच कुटुंबातील १० जण करोनाबाधित

 

पुण्यातून आलेल्या तरूणामुळे एकाच कुटुंबातील १० जण करोनाबाधितअहमदनगर : राज्यात आठ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. वर्धा जिल्ह्यातील एका शाळेतील 100 पेक्षा जास्त जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर नगर जिल्ह्यातील एका गावात एकाच कुटुंबातील १०जणांंना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.  एकाच घरातल्या दहा जणांना कोरोना झाल्याच समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.  श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील दहा जणांना कोरोनाची लागण झालीय. कुटूंबातील एक तरुण पुणे येथे काही दिवस गेला. पुण्याहून घरी आल्यावर त्यास ताप आल्यानंतर तपासणी केली असता ‌कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर कुटूंबातील इतरांची तपासणी केल्यानंतर तरुणासह एकुण 10 जणांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post