'या' टिकटॉक स्टार अभिनेत्याची आत्महत्या

टिकटॉक स्टार अभिनेता समीर गायकवाड यांची आत्महत्या पुणे : टिकटॉक स्टार अभिनेता समीर गायकवाड याने घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीतील त्याच्या घरात त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास केसनंद रस्त्यावरील मिकासा इमारतीत टिकटॉक स्टार अभिनेता समीर गायकवाड याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत समीरला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post