राज्यात आजही रूग्णवाढ कायम, 'इतक्या' नवीन बाधितांची भर
मुंबई : राज्यातील नवीन बाधितांचा आकडा सोमवारी काहीसा कमी आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवारी कोरोनाचे 5 हजार 210 नव्या रुग्णांची नोंद
झाली आहे. 5 हजार 35 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 18 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 19 लाख 99 हजार 982 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.96 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 2.46 टक्क्यांवर आहे.
Post a Comment