राज्यातील चिंता कायम, आज पुन्हा 'इतके' हजारांहून अधिक बाधित

 

राज्यातील नवीन बाधितांची वाढ कायममुंबई: राज्यात करोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असताना कालच्या तुलनेत आज नवीन बाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली नाही. शुक्रवारी राज्यात ६ हजार ११२ इतक्या नवीन बाधितांची नोंद झाली होती. त्यात आज किंचित वाढ झाली असून गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार २८१ नवीन रुग्णांची भर पडली आहे.

राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत करोनाने एकूण ५१ हजार ७५३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.४७ टक्के इतका आहे. आज राज्यात ६ हजार २८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर २ हजार ५६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ९२ हजार ५३० करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post