शेवगाव तालुक्यात गावठी कट्टा विक्रीसाठी गेलेले नगरचे तिघे जेरबंद, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

 शेवगाव तालुक्यात गावठी कट्टा विक्रीसाठी गेलेले नगरचे तिघे जेरबंद, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्तनगर - शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा  येथे गावठी कट्टा व बुलेट मोटार साटकल विक्री करण्यासाठी आलेले आरोपी शेवगाव उपविभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडुन जेरबंद‌ झाले आहे.दिनांक 25/02/2021 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी  सुदर्शन मुंढे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भातकुडगाव फाटा ते भातकुडगावाकडे जाणारे रोडवर  तीन इसम गावठी बनावटीचा कट्टा विक्री साठी बुलेट मोटार सायकलवर येणार आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोना नारायण ,पोकॉ वंसत फुलमाळी,  संदीप बर्डे,  कैलास पवार, पोकॉ विकी पाथरे यांनी संशयित बुलेट मोटार सायकलला हात दाखवून थांबविले असता सदर मोटार सायकल वरील तीन्ही इसम मोटार सायकल जागेवर सोडुन पळू लागले.सदर पळणारे इसमांना शिताफीने पकडुन त्यांना त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नावे कुष्णा बाबासाहेब गुंड (वय 23 वर्ष रा रा अरणगाव मैहराबाद वेशीजवळ अहमदनगर), नवाज रौफ सय्यद (वय 20 वर्ष रा.माळीवाडा भिस्तगल्ली शेजारी अहमदनगर), विकास दिलीप खरपुडे ( वय 30 वर्ष रा बुरुडगाव रोड अहमदनगर) असे असल्याचे कळवले. सदर आरोपींची अंगझडती घेतली असता कृष्णा बाबासाहेब गुंड याचे कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा किमंत 25000 ,नवाज रौफ सय्यद याचे पॅन्टचे खिशामध्ये दोन जिंवत काडतुसे किमत 1000 आणि विकास दिलीप खरपुडे याचे ताब्यात काळे रंगाच्या विना नंबरच्या क्लासीक 350मॉडेलची बुलेट किंमत 225000 असा एकुन 2 लाख 51 हजार किमतीचा मुद्देमाला मिळुन आल्याने तो पंचासह पंचनामा करुन ताब्यात घेतला आहे.

सदर बाबत शेवगाव पोलीस स्टेशनला  गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हाचा पुढील तपास सपोनि सुजित ठाकरे हे करीत आहेत

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक  सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post