सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक

 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेकनगर : राज्यात करोनाचा आलेख वाढत चालला आहे . अनेक जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातही कडक उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील महिन्यात या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आता नव्या आदेशानुसार या प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागला आहे. मागील वर्षी मुदत संपलेल्या सहकारी संस्था, पतसंस्था, सोसायट्या, सहकारी बँकाचा कारभार आधीचे संचालक मंडळच पाहत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post