ऐकावे ते नवलच चक्क शेळीची किंमत 1 लाख 51 हजार रूपये.

 ऐकावे ते नवलच चक्क शेळीची किंमत 1 लाख 51 हजार रूपये. 

नेवासा- गणेश मुळे -तालुक्यातील भेंडा येथील शेतकरी संदीप परसराम मिसाळ यांच्या समृद्धी बोअर गोट फॉर्म मधील आफ्रिकन गोट शेळी त्यांनी 1 लाख 51 हजार रुपयांना तेजस भोईटे ( राहणार- फलटण , मल्हारी बोअर गोट फॉर्म ) यांना विकली असुन याबद्दल समाधान व्यक्त केले आहे . आफ्रिकन गोट शेळीचे वैशिष्ट्ये- या शेळीचे वजन दिवसाला 300 ते 350 ग्रॅम ने वाढते ही शेळी तिसऱ्या वेताला असुन साऊथ आफ्रिका मधुन इंन्पुट केलेल्या मेल पासुन मेटीन केली आहे . या फिमेलची होणारी पैदास पिवरलाईन मधे स्टड होते . या शेळींच्या पिल्लांची वजनवाढ दिवसाला 400 ते 450 ग्रॅम वाढते . आफ्रिकन शेळीचे खाद्य या शेळीला दिवसाला 1 किलो खाद्य लागते.यामुळे दररोज 30 ते 35 रूपये खर्च येतो तर एका वेताला 2 लाख रुपये उत्पन्न मिळते असे शेतकरी संदीप मिसाळ यांनी सांगितले . आज रोजी संदिप मिसाळ यांच्या कडे 15 आफ्रिकन जातीच्या फिमेल शेळ्या आहेत . ते प्रत्तेक वर्षाकाठी सुमारे 15 ते 16 लाख रुपये कमावतात .2016 पासुन त्यांनी हा समृद्धी बोअर गोट फॉर्म चालू केला असून ही आफ्रिकन गोट शेळी 1 लाख 51 हजार रुपयांना विकल्या मुळे समृद्धी बोअर गोट फॉर्म चे मालक संदीप मिसाळ त्यांनी फेटा बांधून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला . यावेळी उधोजक बापुदादा नजन , श्रीधर मिसाळ , बाळु मिसाळ ,डॉ.ढवाण , राजु तागड , खंडु मिसाळ तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post