लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई
मुंबई : अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊनबाबत खोटी माहिती सध्या सोशल मीडियावर पसरवली जात आहे. त्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशाप्रकारे खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत’, असं ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन बाबत खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर आला लगाम लागण्याची शक्यता आहे.
Post a Comment