औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, ५ जण ठार

 

औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, ५ जण ठारनगर-औरंगाबाद महामार्गावर     स्विफ्ट  व खाजगी आराम बसमध्ये मोठा अपघात घडला.श्री क्षेत्र देवगड फाटा भागात हा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या लक्झरी बसला रविवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. औरंगाबादहून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कारची श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ बससोबत भीषण धडक झाली.

धडक इतकी भीषण होती, की कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूवर धडकून तिचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात कारमधील पाच जणांना जागीच प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेले सर्व जण जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post