नितीन गडकरींच्या खात्याने महामार्ग उभारणीत केला विश्व विक्रम
नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या काम करताना सर्वाधिक प्रमाणात काँक्रिटचा वापर करून द्रुतगती महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. ही माहिती स्वत: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे दिली आहे. या कामाद्वारे विश्वविक्रमाचीच नोंद केली गेल्याचेही गडकरी यांनी जाहीर केले आहे.
२४ तासांच्या कालावधीत हे काम करण्यात आले. या कामामुळे चार विक्रम मोडीत निघाले आहेत, असे गडकरी यांनी माहिती देताना सांगितले. देशासाठी पायाभूत सुविधा आता आधीपेक्षाही अधिक वेगाने तयार करण्यात येत आहे असे सांगत आम्ही केवळ नवीन मापदंड घालून दिले नाहीत, तर जागतिक विक्रमही प्रस्थापित केला असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.
Post a Comment