रेबिजमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यात कुत्र्यांचे‌ लसीकरण


रेबीज मुक्ती अभियानास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य – मंत्री सुनिल केदार



मुंबई, दि. 17 : प्राण्यांपासून होणाऱ्या रेबीज या आजाराला मुक्त करण्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेने सुरु केलेले रेबीज मुक्ती अभियान २०२५ या उपक्रमास राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असून दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

जीव – जंतू कल्याण दिन 2021 निमित्त  रेबीज (rabies) मुक्ती अभियान २०२५ चा शुभारंभ मंत्रालय परिसरात करताना ते बोलत होते. यावेळी आमदार आशिष जयस्वाल आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. दगडू लोंढे आणि सदस्य उपस्थित होते.

यावेळी सुनिल केदार यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात स्वानाचे रेबीज लसीकरण करण्यात आले. रुग्ण वाहिकेला श्री.केदार यांनी हिरवी झेंडी दाखवून अभियानास प्रारंभ केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post