विकेल ते पिकेल संकल्पनेवर गावागावात भरणार 'रयत बाजार'विकेल ते पिकेल संकल्पनेवर गावागावात भरणार 'रयत बाजार', पारनेर तालुक्यात शुभारंभ


नगर : "विकेल ते पिकेल " या संकल्पनेवर आधारीत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजारा अंतर्गत बाजारतळ पारनेर येथे,शेतकरी बांधवासाठी रयत बाजार सुरु करण्यात आला!

 


आमदार निलेश लंके, तहसिलदार सौ.ज्योती देवरे,नगरपंचायत मुख्याधिकारी,डॉ.सुनिता कुमावत, तालुका कृषी अधिकारी गायकवाड साहेब व अनेक पदाधिकारी हितचिंतक व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत या रयत बाजाराचे उद्घाटन झाले.

 गोसावीबाबा शेतकरी गट,पारनेर बजरंगबली शेतकरी गट,वडनेर हवेली,व राजे शिवाजी शेतकरी गट,करंदी या गटांनी सहभाग घेऊन आपला शेतमाल  ठेवला विक्रीस !

 शेतक-यांना चांगला भाव,ग्राहकाला ताजे फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यासाठी ,“ विकेल ते पिकेल"या संकल्पनेवर आधारीत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान  राबविण्यात येनार !

या रयत बाजारात शेतकरी-शेतकरी गट यांना कोणत्याही मध्यस्ती शिवाय ग्राहकांपर्यंत जोडण्यात येणार आहे !

या अभियाना अंतर्गत,तालुक्यातील सर्व शेतकरी गट-शेतकरी यांना या बाबत प्रवृत्त करुन तसेच तालुक्यातील पारनेर,सुपा,निघोज,अळकुटी,टाकळी ढोकेश्वर,भाळवणी या प्रमुख बाजारपेठा बरोबरच इतर असे एकुण १०० रयत बाजार सुरु करण्याचे नियोजन सुरु आहे.यामध्ये गावातील मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यात येत असुन ,सर्व शेतकरी गट/शेतकरी यांना सदर ठिकाणी आपला शेतमाल विक्रीस ठेवावा व ग्राहकांनी प्राध्यान्याने शेतक-यांन कडुनच शेतमाल खरेदी करावा असे आवाहन तालुका कृषिअधिकारी श्री.विलास गायकवाड यांनी केले आहे !

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post