अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली
भाजप नेते निलेश राणे यांचे सूचक ट्विट
मुंबई: भाजप नेते निलेश राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी ‘अजित पवारांच्या नॉट रिचेबल होण्याची वेळ आली’, असे सूचक वक्तव्य केले आहे. अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत. पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं. पण आता दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. याचा अर्थ अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असे निलेश राणे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यातील सरकारमध्ये कॉंग्रेसलाही उपमुख्यमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. स्वतः अजित पवारांनी या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु आता राणे यांनी केलेल्या ट्वटिमुळे आणखी वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे.
Post a Comment