राज्यावर अवकाळी पावसाचे ढग, 'या' दरम्यान वादळी पाऊस

 राज्यावर अवकाळी पावसाचे ढग, १६ ते १८ दरम्यान वादळी पाऊस



पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात गुरुवारी पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रलगत आलेल्या चक्रवातामुळे पुणे शहरात 16 फेब्रुवारीपासून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात वाढ होऊन ते 16 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 18 फेब्रुवारी रोजी आकाश सामन्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खरंतर, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार 16 ते 18 फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर वादळी पाऊस होऊ शकतो.

18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post