नगर जिल्ह्यात 'या' खासगी रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था

नगर जिल्ह्यात ३५ खासगी रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था



 नवी दिल्ली: केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार खासगी रुग्णालयं कोरोना लसीकरण केंद्र म्हणून काम करणार आहेत. इथ कोरोना लसीकरणासाठी प्रत्येक व्यक्तीला 250 रुपये खर्च येणार आहे. कोविन अ‌ॅपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या लसीसाठी रुग्णालयांना 250 रुपये दर आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यातील 150 रुपये रुग्णालयांना शासनाकडे भरावे लागणार आहेत. पंतप्रधान आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनांचे लाभ देणाऱ्या रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार आहे. आयुष्यमान भारत योजनेतील महाराष्ट्रातील 659 खासगी रुग्णालयांची कोरोना लसीकरण केंद्रासाठी निवड करण्यात आली आहे.  यात नगर जिल्ह्यातील ३५ रूग्णालयांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post