पेन्शनच्या उत्पन्नावर संपूर्ण करमाफी, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना लाभ
देशातील ७५ वर्षांवरील नागरिकांना पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटर्नपासून मुक्ती मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटदरम्यान याबाबत घोषणा केली.सीतारामन म्हणाल्या, “देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात ज्येष्ठांना नमन करताना मी त्यांच्यासाठी नवी तरतूद केली आहे. ७५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना केवळ पेन्शन आणि त्यावरील व्याजातूनच उत्पन्न मिळते त्यांना पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटर्न न भरण्याचा मी प्रस्ताव मांडत आहे.”
Post a Comment