जिल्ह्यातील 'या' पंचायत समितींच्या रिक्त जागांवर पोटनिवडणुक, १८ फेब्रुवारीला प्रारुप मतदार यादी

 नगर जिल्ह्यातील  पंचायत समितींच्या रिक्त जागांवर पोटनिवडणुक, १८ फेब्रुवारीला प्रारुप मतदार यादीनगर : राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रम जाहीर केला आहे. यात नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व अकोले पंचायत समितीच्या २ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुक होणार असून सातेवाडी (अकोले) व काष्टी (श्रीगोंदा) या पंचायत समिती गणांची प्रारूप मतदार यादी १८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होईल. हरकती, सुनावणी नंतर १० मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post