नियमावली कडक, मास्क न‌ घातल्यास १ हजारांचा भुर्दंड

 

नियमावली कडक, मास्क न‌ घातल्यास १ हजारांचा भुर्दंडपुणे : मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचे रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पुण्यातील वाढता कोरोना लक्षात घेता शहरात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. पुण्यात पहिल्यांदा एखादा व्यक्ती मास्क न घालता आढळल्यास 500 रुपये दंड करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा तोच व्यक्ती जर मास्क न घालता आढळला, तर त्याच्याकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे. यासाठी पुणे पोलिसांकडे आधीपासूनच व्यवस्था करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post