शासकीय नोकर भरतीबाबत मोठा निर्णय, संगणक टायपिंग कोर्स केलेल्यांना फायदा

 

शासकीय नोकर भरतीत संगणक टायपिंग कोर्सला 'संगणक अर्हता' म्हणून मान्यतानगर-  शासनाचे सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञानमंत्रालयमुंबई विभागाने शासकिय सेवेतील गट संवर्गातील पदभरती जाहिरातीमध्ये संगणक अर्हतेबाबत शासन निर्णय  पुरक पत्रांचा संदर्भ देणेबाबत दिनांक 5 फेब्रुवारी 2021 रोजी शासन परिपत्रकान्वये नमुद केलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे मार्फत घेण्यात येणा-या संगणक टंकलेखन परीक्षा  गर्व्हनमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपींग कोर्स इंग्रजीमराठीहिंदी 30, 40 .प्र.मि. (जीसीसी-टिबीसीउत्तीर्ण प्रमाणपत्र या अभ्यासक्रमास ‘संगणक अर्हता’ म्हणुन मान्यता देण्यात आली आहेअशी माहिती महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी दिली.

     यापुढे शासकिय सेवेतील गट  संवर्गातील अधिकारी / कर्मचार्यांसाठी  आवश्यक असणारी संगणक अर्हता  शासन निर्णय  पुरक पत्राव्दारे निश्चित करण्यात आली आहेयास्तवसंवर्गातील शासकिय पदभरती जाहिरातीमध्ये संदर्भाधीन अनु.क्र. 2,3  4 येथील शासन निर्णय  पुरक पत्रांचा संदर्भ देणे शासनाच्या सर्व विभाग / कार्यालये / महामंडळे / स्वायत्त संस्थाउपक्रम .ना बंधनकारक करण्यात येत आहे असे आदेशात नमुद केले आहे.

      महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रिडा विभागाचे नियंत्रित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत 31 ऑक्टोबर 2013 अन्वये सुरु झालेला संगणक टंकलेान जीसीसीटिबीसी म्हणजेच गर्व्हनमेंट कॉम्प्युटर टायपींग बेसिक कोर्स इंग्रजीमराठीहिंदी 30,40 .प्र.मिला संगणक अर्हतेचा नोकर भरतीत सामावेश होणारा 16 जुलै 2018 चा शासन आदेशाचा नोकर भरतीच्या जाहिरात उल्लेा होणार असल्याने राज्यातील 3500 हजार शासन मान्य संगणक संस्थामध्ये आनंद निर्माण झाला आहे.

     शासकिय सेवेतील पदभरती जाहिरातीमध्ये संदर्भादिन शासन निर्णय  पुरक पत्रांच्या संदर्भ देण्याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित विभाग/कार्यालय/महामंडळे/स्वायत्त संस्था/उपक्रम असेल तसेच यापुढे वेळोवेळी संगणक अर्हता अभ्यासक्रमामध्ये नविन अभ्यासक्रमाचा सामावेश करण्याकरीता शासन स्तरावर जे निर्णय निर्गमित करण्यात येतील त्याचा सुध्दा सामावेश शासकिय पदभरती जाहिराती मध्ये करण्यात यावासदर शासन आदेश परिपत्रक सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिपत्यााालील सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या निदर्शणास आणावे असे शासन आदेशात नमुद केले आहे.

     या निर्णया सुमारे 6 लाख विदयार्थ्यांना फायदा होणार असल्याने महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेान शासन मान्य संस्थांच्या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळेमहासचिव हेमंत ढमढेरेवरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश पोरेप्रवक्ते सुभाष पाटीलकोषाध्यक्ष सुभाष बागडपरीक्षा सचिव अभिलाषा नाईकप्रसिध्दी प्रमुख संतोष झंजाडसहसचिव अरुण चांडक  समस्त कार्यकारणीने स्वागत केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post