अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार : मंत्री विजय वडेट्टीवार
नागपूर : करोनाचा वाढलेला धोका लक्षात घेता सरकार अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. संध्याकाळी 6 नंतर पहाटेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीनुसार तिथल्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मात्र, त्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने लोकांनी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे.
Post a Comment