जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत निर्बंध आदेश
नगर -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणुन नागरिकांना
सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणुन, जिल्हादंडाधिकारी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन, अहमदनगर जिल्हा महसूलस्थळ सीमेच्या हद्दीमध्ये या आदेशान्वये दि.23/02/2021 रोजी 00.00 पासुन ते दि.15/03/2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये खालील बाबींस मनाई करीत आहे.
अ) सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील.
ब) अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर | फिरण्यावर रात्री 10.00 ते सकाळी 5.00या कालावधीत निबंध राहील. दुकान सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत खुली राहणार आहेत.
Post a Comment